DPU Hospital Launches New Research Center
पिंपरीतील डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व जनजागृतीपर व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी, हिमोग्लोबिन, बी पी, इसीजी तपासणी, (डायबेटिक न्यूरोपॅथी) पायांच्या नसांची तपासणी, (डायबेटिक रेटिनोपॅथी) डोळ्यांच्या नसांची तपासणी, भौतिकोपचार, व्यायाम आणि आहार मार्गदर्शन, मधुमेही रुग्णांच्या पायाची काळजी संबधी (डायबेटीक फुट) व स्वादुपिंड प्रत्यारोपणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते या शिबिरात 400 हून अधिक नागरिकांनी तपासणी केली तर व्याख्यान कार्यक्रमात 600 हुन अधिक सहभागी होता.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ वृषाली पाटील (प्रसिद्ध ट्रान्सप्लांट सर्जन), शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ. वत्सला स्वामी, डॉ. ए. एल. काकरानी, वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भवाळकर, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. शुभांगी कानिटकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण व प्रमुख व्याख्याते सुप्रसिद्ध कवी श्री. अनंत राऊत, सूत्रसंचालन दिगंबर ढोकले, मधुमेह तज्ज्ञ व एंडोक्राइनोलॉजी तज्ज्ञ डॉ. विनायक हराळे , प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अनु गायकवाड, प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. विजयश्री गोखले, आदी उपस्थित होते. या शिबिरातील काही विशेष प्रसंगांची क्षणचित्रे: