CME event - DPU Super Specialty Hospital

News & Events

CME event - DPU Super Specialty Hospital

News & Events

DPU Hospital Hosts 20th Annual Medical Conference

लिम्फॅन्गिओलिओमायोमॅटोसिस (एलएएम) या दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या आजारामुळे ११ वर्षे त्रस्त असलेल्या आणि त्यामुळेच फुफ्फुस आणि हृदय निकामी झालेल्या प्राजक्ता दुगम यांची डी. पी. यू. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे नुकतीच यशस्वी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

डॉ. संदीप अट्टावार यांच्या नेतृत्वाखालील डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. रणजित पवार, डॉ. प्रभात दत्ता, डॉ. विपुल शर्मा, आणि डॉ. संदीप जुनघरे या टीमने सुमारे आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही अवघड कामगिरी पार पाडली. या रुग्णालयात तसेच पुणे परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे. यशस्वी प्रत्यारोपण केल्याबद्दल डी. पी. यू. हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे अभिनंदन!

सिंहगड रोड येथील रहिवाशी व बँक कर्मचारी प्राजक्ता दुगम यांना गेल्या ११ वर्षांपासून फुफ्फुसाचा लिम्फॅन्गिओलिओमायोमॅटोसिस (एलएएम) हा दुर्मीळ समजला जाणारा आजार होता. हा आजार तरुण महिलांना शक्यतो बाळंतपणाच्या काळात होतो. प्राजक्ता यांना आजारामुळे ऑक्सिजन सिलींडर पाठीवर बांधून कामावर जावे लागत होते. तरीही त्यांचे हृदय आणि फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. अशा परिस्थितीत अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. एका २७ वर्षीय ब्रेन-डेड महिलेच्या नातेवाइकांनी मृत्युनंतर तिचे सर्व अवयव दान करण्यास संमती दिल्यामुळेच प्राजक्ता यांना हृदय आणि फुफ्फुस बसवण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्राजक्ता यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

  • CME event - DPU Super Specialty Hospital
  • CME event - DPU Super Specialty Hospital
  • CME event - DPU Super Specialty Hospital
  • CME event - DPU Super Specialty Hospital
  • CME event - DPU Super Specialty Hospital
  • CME event - DPU Super Specialty Hospital